ऑक्टोपसबाबांची मुलाखत
जुलै 14th, 2010 § १ प्रतिक्रिया
आज या ब्लॉगच्या उद्घाटन जागतिक ‘स्टार’ ऑक्टोपस बाबांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली हितगुज.
मी- जय ऑक्टोपस बाबा!
बाबा- (सर्व पाय वर करून..) विनोद जय माझी नाही करायची रे! सगळी त्या परमेश्वराची कृपा आहे.
मी- तुम्ही सध्याला जगातील एक क्रमांकाचे अचूक भविष्य सांगणारे ‘ज्योतिषी’ आहात. गेल्या काही दिवसात तुम्ही जे भविष्य सांगितले ते अगदी तंतोतंत खरे झाले. कसं काय तुम्ही इतके अचूक भविष्य सांगता?
बाबा- (एका पायाने डोके खाजवत..) सगळी त्या ईश्वराची कृपा. आणि फिफाची सुद्धा.
मी- तुम्ही ज्योतिषी बनण्याचा का निर्णय घेतलात?
बाबा- ते माझ्या भविष्यात लिहिलेलं होते.
मी- हे तुम्हाला कसं माहित?
बाबा- कारण सर्वात पहिले मी माझे भविष्य बघितले.
मी- ज्योतिष विद्या कुठे शिकालीत?
बाबा- पाण्यात.
मी- आपले गुरु कोण?
बाबा- माता पिता हेच आपले गुरु असतात.
मी- तुमचे माता पिता देखील ज्योतिषी होते का?
बाबा- नाही रे! ते तर जलचर मुक्ती मोर्चाचे ते एक कार्यकर्ते होते.
मी- आपण फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतच का भविष्यवाणी केलीत?
बाबा- त्याचे काय आहे. मलाही फुटबॉल आवडतो. म्हणून मी माझ्या करिअरची सुरवात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेपासून केली.
मी- तुम्हाला मी भारत देशाबद्दल भविष्यवाणी करायला सांगितली तर, तुम्ही काय भविष्य सांगाल?
बाबा- अरे भारतात सर्वच ज्योतिषी आहेत. आता त्यांचे भविष्य माझ्यासारखा ‘पादचारी’ काय सांगणार?
मी- म्हणजे? मी समजलो नाही..
बाबा- अरे विनोद, तू फारच विनोदी आहेस. तुमच्या येथील सर्वच नेतेमंडळी कायम भाववाढीवर ‘भविष्य’ करीतच असतात ना. आणि खेळाडू देखील तेच करतात. आणि ज्या देशाला मुळात वर्तमानच नाही. त्यावर मी भविष्य काय वर्तवणार?
मी- मला अस कळलंय, की शिल्पा शिट्टी तुमच्या प्रेमात पडली वगैरे..
बाबा- अरे अस काही नाही. तिने मला भेटायची ‘डेट’ विचारली आहे.
मी- कधी?
बाबा- मी तिला स्पष्टपणे सांगितले आहे. मी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये आहे.
मी- काय सांगताय?
बाबा- मग नाही तर काय..
मी- मग त्यावर ती काय म्हणाली?
बाबा- तिला तीच्या आयपीएल टीमचे भविष्य विचारायचे होते. पण मी तिला आता मी भविष्याचा बिझनेस बंद केला आहे अस सांगितले आहे.
मी- तुमच्या गर्लफ्रेंड चे नाव?
बाबा- बायको आहे रे माझी ती
मी- म्हणजे? लग्न कधी केलत तुम्ही?
बाबा- वयाच्या दुसर्यावर्षी.
मी- इतक्या कमी वयात?
बाबा- अरे विनोद, किती विनोद करशील? आमच्या ‘स्टार’ कायद्यानुसार वयाचे सहा महिने पूर्ण होताच फिश विवाहास पात्र ठरतात.
मी- छान आहेत.. तुमची बायको कुठे असते?
बाबा- पाण्यात..
मी- नाव?
बाबा-
पाण्यातल्या पाण्यात मी होतो भिजलेला,
पाण्यातल्या पाण्यात मी होतो भिजलेला,
जेनीचे नाव घेतो, पाण्याने टॅंक होता भरलेला..
मी- वा वा! सही.
बाबा- येते मला. तुमच्या राष्ट्रपतीसारखे नाही.
मी- म्हणजे आता तुम्हालाही कळले तर
बाबा- साऱ्या जगाला माहिती आहे.
मी- तुम्ही सही कशी करता?
बाबा- पंजांनी स्टार काढतो बस्स, झाली सही. सही आहे ना?
मी- सही आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला जनतेला काय संदेश द्याल?
बाबा- त्या पत्रकारांना माझी नम्र विनंती आहे. की माझे जरा चांगले फोटो वर्तमानपत्रात छापावेत. उगाचंच काहीही टाकू नये.
मी- का काय झालं?
बाबा- अरे, माझ्या बायकोला एका वर्तमानपत्रात माझे फोटोत ‘फाईव्ह पॅक’ दिसले नाहीत. त्यामुळे तिने आज काहीच जेवायला दिले नाही.
मी- अच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.
बाबा- हो हो..
sahi vinodi ahe